गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पिंपळेसौदागरमधील घाटांची स्वच्छता

94

चिंचवड, दि. ८ (पीसीबी) – गणेशोत्सव तोंडावर आल्यामुळे पिंपळेसौदागर येथील देवी आई माता व दत्त मंदिर घाट, नादीपात्र तसेच परिसराची साफसफआई करण्यात आली. भाजपचे नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी त्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा केला.

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. तरीही पिंपळेसौदागरमधील गणेश विसर्जन घाटाची साफसफाई करण्यात आलेली नव्हती. नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी आरोग्य विभागाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर देवी आई माता व दत्त मंदिर घाट, नदीपात्र परिसर तसेच बाकी सर्व घाटांची साफसफाई करण्यात आली.