गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले 

106

सिंधुदुर्ग, दि. १३ (पीसीबी) – ऐन  गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी कोकण रेल्वेचे वेळापत्रक  कोलमडले आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गाड्या पाच तास उशिराने धावत असल्याने गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या गणेशभक्तांना  मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले.   

बुधवारी रात्री कोकणात  जाण्यासाठी गणेश भक्त निघाले होते. मात्र, कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने  त्यांना  वेळवेर पोहोचता आले नाही. बऱ्याच गाड्या अर्धा तास उशिराने तर काही गाड्या सुमारे पाच तास उशिराने धावत आहेत. डाऊन मांडवी,  डबल डेकर,  दुरांतो,  हापा, निझामुद्दीन एक्सप्रेस वगळता इतर सर्व गाड्या उशिराने धावत आहेत.

दरम्यान, गणेश भक्तांना मनस्तापाला सामोरे जावे लागले.  कोकणात जाणाऱ्या सर्वच गाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याने प्रवाशांचे  हाल होत आहेत. ट्रेन बंचिंगमुळे रेल्वेचे वेळापत्रक कोलमडल्याने गाड्या एकामागे एक थांबल्या आहेत. त्यामुळे गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.