गडचिरोलीत भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू; दोन लहान बाळंही दगावली

103

गडचिरोली, दि. १ (पीसीबी) – आलापल्ली सिरोंचा मार्गावर गोविंदगाव फाट्यावर कार आणि सहा आसनी रिक्षाच्या झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला आहे. चंद्रपुरहुन कालेश्वरला दर्शनाला जाणा-या मित्तलवार कुटुंबातील पाच सदस्यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यु झाला आहे.

मृतांमध्ये मित्तलवार कुटुंबातील आई-वडीलांसह लहान मुलांचाही समावेश आहे. सहा आसनी रिक्षाचा चालक तसेच कारमधील दोन लहान बाळंही दगावली आहेत. सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सुझुकी बलेनो कार आणि सहा आसनी रिक्षाची जोरदार धडक होऊन हा अपघात झाला.