गटबाजीला कंटाळून उर्मिला मातोंडकरांनी काँग्रेस सोडली – सत्यजीत तांबे

133

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – अभिनेत्री व काँग्रस नेत्या  उर्मिला मातोंडकर पक्षातील गटबाजीला कंटाळून सोडून गेल्या आहेत, असे सांगून महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पक्षातील नेत्यांना घरचा आहेर दिला आहे.

उर्मिला मातोंडकर यांनी मंगळवारी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.  यावर एका वृत्तवाहिनीशी बोलताना तांबे यांनी  काँग्रेसमधील नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत.

तांबे म्हणाले की, काँग्रेसने जी वागणूक उर्मिला यांना दिली ती निषेधार्हच आहे. अशी असेट गमावणे हे पक्षाला नुकसानकारक आहे.

उर्मिलाजींनी पक्ष जरी सोडला असला तरी त्या दुसऱ्या कुठल्याही पक्षात जाणार नाहीत. त्या विचारधारेशी एकनिष्ठ असून विचारधारेशी तडजोड करणार नाहीत. पक्षांतर्गत गटबाजी आहे आणि उर्मिलाजी फार राजकीय नसल्याने त्यांना हे सहन झाले नाही. त्यामुळे याकडे पक्षश्रेष्ठींनी लक्ष द्यावे, असेही तांबे यावेळी म्हणाले.