गगनबावड्यात दोन एसटी बसची समोरासमोर धडक; वृद्ध महिला ठार,२० प्रवासी जखमी

80

कोल्हापूर, दि. १३ (पीसीबी) – गगनबावडा तालुक्यात दोन एसटी बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात अपघात झाला. या अपघातात एक वृद्ध महिला जागीच ठार झाली आहे. तर,२० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

आज (शुक्रवारी) सकाळी ९ वाजेच्या सुमारास गगनबावडा तालुक्यातील लोंघे गावाजवळ ही दुर्घटना घडली. अपघातातील जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.