खोटे ओळखपत्र देऊन भाड्याने कॅमेरे घेतले आणि……

60

चिंचवड, दि. २८ (पीसीबी) – भाड्याने घेतलेल्या दोन कॅमेऱ्यांचा अपहार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बिजलीनगर, चिंचवड येथे 24 जुलै रोजी घडली.

प्रकाश अरुण मदने (रा. जय भवानीनगर, कोथरूड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. सुरज संजय बारबोले (वय 18 रा. शिवनगरी, बिजलीनगर, चिंचवड) यांनी मंगळवारी (दि.27) चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जुलै रोजी सकाळी 9 वाजताच्या सुमारास आरोपी मदने याने फिर्यादी बारबोले यांचा निकॉन कंपनीचे दोन कॅमेरा भाड्याने घेतले. मात्र दिलेल्या मुदतीत कॅमेरे परत केले नाहीत. तसे खोटे ओळखपत्र देऊन त्यांची 40 हजार 670 रुपये यांची फसवणूक केली. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare