खेड येथील भामा आरखेड धरणाच्या पाण्यात शेतकरी बुडाला

181

खेड, दि. ८ (पीसीबी) – खेडच्या भामा आरखेड धरणात एक शेतकरी बुडाल्याची घटना घडली. ही घटना आज (शनिवारी) सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू आहे.

ज्ञानेश्वर शांताराम गुंजाळ (वय ३५, रा. रौनदळवाडी) असे बुडालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानेश्वर गुंजाळ हे आज (शनिवारी) सकाळच्या सुमारास खेड परिसरातील भामा आसखेड धरणावर आले होते. त्यांनी तेथील धरणाच्या पाण्यात हात, पाय, तोंड धुतले आणि धरणाच्या पाण्यात थेट उडी घेतली. मात्र, त्यानंतर ते वर आलेच नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, ज्ञानेश्वर हे पाण्यात बुडाले की त्यांनी उडी घेवून आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. चाकण पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांचा शोध घेत आहेत.