खेडमध्ये लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वर्षभर बलात्कार

1861

खेड, दि. ३१ (पीसीबी) – लग्नाचे आमिष दाखवून एका २२ वर्षीय तरुणीवर वर्षभर बलात्कार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. ही घटना खेड तालुक्यात जुलै २०१७ ते जून २०१८ दरम्यान घडली.

याप्रकरणी पीडित तरुणीने खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खेड पोलिसांनी योगेश बजरंग डवणे (रा. नायफड, ता खेड ) याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची एक वर्षापूर्वी  योगेशसोबत मैत्री झाली होती. या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यानंतर तिला लग्न आमिष दाखवून योगेशने तिच्यावर वर्षभर लॉजवर नेऊन बलात्कार केला. पीडित तरुणीने लग्नाची मागणी केली असता आरोपी योगेशने एका मुलीशी रजिस्टर लग्न केले असल्याचे सांगितले. मी तुझ़्याशी लग्न करणार नाही तुला काय करायचे ते कर असे पीडित तरुणीला सांगितले. यामुळे पिडीत तरुणीने खेड पोलीस ठाण्यात योगेश विरोधात तक्रार दाखल केली. खेड पोलिस तपास करत आहेत.