खेडमध्ये एका २२ वर्षीय विवाहित महिलेचे अश्लील फोटो व्हॉट्सअॅपवर व्हायरल करण्याची धमकी देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना खेडमधील चासकमान येथे घडली आहे.

सिध्दार्थ कैलास नाईकरे असे बलात्कार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने आरोपी विरोधात  खेड पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे अश्लील फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी सिध्दार्थने वारंवार या महिलेवर बलात्कार केला आहे. काही दिवसांनंतर महिलेने शारिरीक संबंधास नकार दिल्याने आरोपीने व्हॉट्सअॅपवर पीडित महिलेचे अश्लील फोटो वायरल केले. ही बाब लक्षात येतात पीडित महिलेने रात्री उशिरा खेड पोलीसांत याबाबत फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, आरोपी सिद्धार्थ फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.