खुशखबर! जिओ फोन १ होणार स्वस्त, नवीन फिचर्सही मिळणार

170

दिल्ली, दि. १६ (पीसीबी) – जिओ फोन १ आता अधिक स्वस्त होणार असून त्याच्यामध्ये अनेक नवीन फिचर्सही अॅड होणार आहेत. जिओचे सबस्क्रायबर्स वाढावेत म्हणून कंपनी या फोनची किंमत कमी करणार असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

जिओ फोन २ला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला नसल्यामुळे पुन्हा एकदा जिओ फोन १वरच लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय रिलायंसने घेतला आहे. तसेच जिओच्या सबस्क्रायबर्सची संख्या ५० कोटींवर पोहोचवण्याचे कंपनीसमोर टार्गेट आहे. त्यादृष्टीनेही या फोनची किंमत कमी करण्याचा विचार करण्यात येतो आहे. किंमत कमी करण्यासोबतच जिओचे काही नवीन अॅप्स या फोनमध्ये देण्यात येणार आहेत. शेतीविषयक, मनोरंजन, इंग्रजीविषयक अॅप या फोनमध्ये दिले जाऊ शकतात. जिओ फोन २ची किंमत जास्त असल्यामुळे त्याचा खप जास्त झाला नाही. त्यामुळे जिओ फोन १ची किंमत कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिओ फोन १ लॉंच झाला तेव्हा त्याची किंमत १५०० रुपये होती. या फोनमध्ये ४९ रुपयांपासूनचे नेट पॅकही मिळत होते. या फोनमुळे सुरुवातीच्या काळात कंपनीला भरपूर नफा झाला होता. पण नंतरच्या काळात कंपनीचे शेअर्स तब्बल २८ टक्क्यांनी घसरले. आता पुन्हा एकदा कंपनीचा नफा वाढवण्यासाठी जिओ फोन १ बाजारात येणार आहे.