खुनाच्या गुन्ह्यात एक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अटक

152

चिंचवड, दि. १५ (पीसीबी) – चिंचवड येथील हनुमान मंदिरासमोर एकाचा धारदार शस्त्राने वार करून आणि डोक्यात दगडी पाटा घालून खून करण्यात आला होता. ही घटना 22 ऑगस्ट 2020 रोजी घडली होती. यातील एक आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होता. त्याला अटक करण्यात आली आहे.

शंकर गोविंद सुतार असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तुषार झेंडे याला पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी यापूर्वी नऊ आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खंडणी विरोधी पथकातील संदीप पाटील व शैलेश मगर यांना सोमवारी (दि. 14) माहिती मिळाली की, आरोपी तुषार झेंडे हा नाव बदलून संतोषनगर, कात्रज येथे राहत आहे. त्यानुसार पोलिसांनी संबंधित ठिकाणी जाऊन शोध घेतला असता आरोपी अंजनीनगर येथे भाड्याने खोली घेऊन राहत असल्याचे समजले. त्यानुसार शोध घेतला असता आरोपी संतोषीमाता मंदिराजवळ कोणाची तरी वाट पाहत उभा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

ही कारवाई खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र पाटील, शाकिर जीनेडी, पोलीस अंमलदार सुनील कानगुडे, अशोक गारगोटे, अशोक दुधवणे, किरण काटकर, नागेश माळी यांच्या पथकाने केली.

WhatsAppShare