खिडकीची काच फोडल्याचा जाब विचारला म्हणून तरुणाला घरात घुसून मारहाण; घरातील सामाणाची तोडफोड; दुचाकीही केली लंपास

106

भोसरी, दि. १४ (पीसीबी) – घरच्या खिडकीची काच फोडल्याच्या जाब विचारला म्हणून दोघा टोळक्यांनी तरुणाला घरात घुसून जबर मारहाण करत घरातील वस्तुची तोडफोड करुन, दुचाकी लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवार (दि.१२) रात्री उशीरा निगडीतील रत्नदिप सोसायटी सेक्टर नं.१२ येथे घडली.

अक्षय सोनवणे (वय २२, रा. रत्नदिप सोसायटी, सेक्टर नं.१२, निगडी) असे गंभीर मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याने निगडी पोलीस ठाण्यात दोन अज्ञात इसमांविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन अज्ञात इसमांविरोधात मारहाण आणि वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिेलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय सोनवणे हा मंगळवारी रात्री उशीरा आपल्या घरात घरच्यांसोबत गप्प मारत बसला होता. यावेळी ते राहत असलेल्या सोसायटीच्या इमारती खाली दोन टवाळखोर मुले गोंधळ घालत होते. त्या मुलांनी दगड मारुन अक्षय यांच्या घरच्या खिडकीची काच फोडली. त्यावर अक्षय याने त्या दोघांना जाब विचारला असता त्या दोघांनी अक्षय याच्या घरात घुसून घरातील सामानाची तोडफोड करुन शिवीगाळ करत, लोखंडी पाईपने अक्षयला जबर मारहाण केली. यामध्ये त्यांच्या उजव्याहाताला गंभीर दुखापत झाली. तसेच अक्षय याच्या ताब्यातील ५० हजार रुपये किमतीची मोटार सायकल जबरदस्तीने घेऊन फरार झाले. अक्षयने दोन अज्ञात इसमांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलीस उपनिरीक्षक मोरे तपास करत आहेत.