खासदार सुप्रिया सुळेंनी हिंजवडीतील वाहतूक कोंडीची केली पाहणी    

235

चिंचवड, दि. १० (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज (सोमवारी) हिंजवडीतील वाहतूक कोंडीची पाहणी  केली. एकेरी वाहतूक सुरु केल्याबद्द्ल त्यांनी समाधान व्यक्त करून वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.  

खासदार सुळे यांनी आज हिंजवडी ग्रामंपचायात कार्यालयामध्ये पीएमआरडीए, एमआयडीसी, पोलीस, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्थानिक नागरिक, हिंजवडी असोसिएशन यांची संयुक्त बैठक घेतली.

यावेळी सुळे यांनी प्रलंबित रस्ते विकसित करण्यासाठी पीएमआरडीए, एमआयडीसीने हिंजवडीतील शेतकऱ्यांना योग्य मोबदला देऊन जागा ताब्यात घ्याव्यात, असे आदेश दिले.  तसेच  रस्त्यावर अतिक्रमण होणार नाही, याची यापुढे दक्षता घेण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.  वाहतूक कोडींचा अभ्यास करून येत्या आठ दिवसात  त्याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश सुळे यांनी दिले.