खासदार प्रीतम मुंडेंनी कार थांबवून दिला अपघातग्रस्त महिलेला आधार

112

बीड, दि. १८ (पीसीबी) – खासदार प्रीतम मुंडे यांनी कार थांबवून एका  अपघातग्रस्त महिलेला मदत केली. महिलेला पाणी देऊन तातडीने रूग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था करून त्या आपल्या नियोजित दौऱ्याच्या ठिकाणाकडे रवाना झाल्या.

आज (शनिवार) लिंबोटा या ठिकाणी प्रीतम मुंडे यांनी श्रमदान केले. त्यानंतर त्या सिरसाळा मार्गावरून सरफराजपूरकडे श्रमदानासाठी निघाल्या होत्या. त्यावेळी रस्त्यावर त्यांना अपघात झालेल्या लताबाई  दिसल्या. प्रीतम मुंडे यांनी कार थांबवली.  त्यांनी  आपल्याकडे असलेले पाणी त्यांनी लताबाईंना प्यायला दिले. तसेच लताबाईंना तातडीने रूग्णालयात दाखल करण्याची व्यवस्थाही केली.

पांगरी येथील माऊली क्लिनिकमध्ये लताबाई भोसलेंना दाखल करण्यात आले.   मुंडे वॉटरकप स्पर्धेनिमित्त सरफराजपूरकडे निघाल्या होत्या. त्याचवेळी त्यांना अपघातग्रस्त लताबाई दिसल्या. त्यांनी गाडी थांबवून तातडीने लताबाईंची मदत केली. या निमित्त लोकप्रतिनिधींच्या मनातील माणुसकीचे प्रत्यय आला.