खासदार धैर्यशील माने यांचे सोशल मिडियावर कौतुक; मदत साहित्याची पोती स्वत: वाहीली

212

कोल्हापूर, दि. १३ (पीसीबी) – हातकणंगलेतील शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मैदानात उतरले आहेत. त्यांनी स्वत: मदत साहित्याची पोती ट्रकमधून उतरवत मदतीला वेग आणला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कोल्हापूरातील शिरोळ तालुक्यातील पूरग्रस्तांसाठी नवी़न कपडे, तांदूळ-डाळ, खाद्यपदार्थ आणि जिवनावश्यक वस्तू पाठवल्या आहेत. त्यानंतर धैर्यशील माने यांनी सर्वांसोबत प्रत्येक ट्रकमधील ते साहित्य खाली उतरवून घेतले. तसेच ते गरजूंपर्यंत पोहचवले. धैर्यशील माने गेल्या ५ ते ६ दिवसांपासून पूरग्रस्त भागात जाऊन मदत करत आहेत. लोकांना हव ते पूरवत आहेत, यामुळे त्यांचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.