खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्याविषयी वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या शिक्षकाला निलंबित करा; भाजप महिला मोर्चाची मागणी

184

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – भाजप खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्याविषयी फेसबुकवर  वादग्रस्त   पोस्ट  टाकणाऱ्या शिक्षक संजय कुऱ्हाडे यांचे निलंबन करण्यात यावे, अशी  मागणी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा शैला मोळक यांनी कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या प्रेरणा विद्यालयाच्या प्राचार्या शुभांगी इथापे यांच्याकडे केली.

प्राचार्या इथापे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, निगडी येथील प्रेरणा विद्यालयातील सहशिक्षक संजय कुऱ्हाडे याने ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टवर खासदार डॉ. प्रितम मुंडे यांच्याविषयी वादग्रस्त कमेंट टाकली आहे. महिलांच्याविषयी अशा प्रकारची  कमेंट करणे चुकीचे आहे. याप्रकरणी कुऱ्हाडे यांचे तातडीने निलंबन करण्यात यावे, असे या  निवेदनात म्हटले आहे.

यावेळी उमा खापरे, राधिका बोर्लीकर, अश्विनी दाभाडे, अरुणा घोळवे, माधवी इनामदार, सारिका चव्हाण, रेखा कडाली, सविता कर्वे, शोभा भराटे, राजश्री जायभाय, पल्लवी वाल्हेकर, संगीता सुतार, अश्विनी औसेकर आदी उपस्थित होते.