खासदार आनंदराव अडसूळ यांना अटक करण्यासाठी नवनीत राणांचा धडक मोर्चा  

261

अमरावती, दि. ६ (पीसीबी) – शिवसेना खासदार आनंदराव अडसूळ यांच्याविरोधात आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनी पोलिस आयुक्तालयावर आज (सोमवार) भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी त्यांनी अडसूळ यांना अटक करण्याची मागणी केली.  

दरम्यान, आमदार रवी राणा यांच्या विरोधात खासदार अडसूळ यांनी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. खासदार अडसूळ यांनी आमदार राणांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्यानंतर, रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांनीही खासदार अडसूळ यांच्यावर खंडणीचा आणि त्यांचे तीन साथीदारांवर खंडणी आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. त्यामुळे या दोघांचे वाद आता टोकाला गेले आहेत.

आज नवनीत राणा यांनी महिला कार्यकर्त्यांसह पोलिस आयुक्तालयावर धडक मोर्चा काढला. यावेळी त्यांनी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या विरोधातील पुरावे पोलीस आयुक्तांना सादर केले. ज्यामध्ये कॉल डिटेल्स, व्हिडीओ शूटिंग, सोशल मीडियावरील माहितीचा समावेश असल्याचे नवनीत राणा यांनी सांगितले.