खासगी बंदोबस्तात झाले इंदुरीकर महाराजांच किर्तन

102

नगर, दि.१५ (पीसीबी) – समतिथीला मुलगा आणि विषमतिथीला मुलगी होते असे वक्तव्य केल्याने इंदुरीकर महाराज वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. त्यांच्यावर गर्भलिंग निदानाची जाहिरात केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहे. अशातच त्यांच्या या वक्तव्यावर राज्यभरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

दरम्यान, त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे दिसून येत आहे. हभप इंदुरीकर महाराज देशमुख वादाच्या भोवर्यात सापडलेल्या असताना आज (ता. १५ ) नगर येथे खासगी बंदोबस्तात त्यांना कार्यक्रमाच्या स्थळी आणण्यात आले. खासगी सुरक्षारक्षकांच्या मदतीने महाराजांचे कीर्तन पार पाडले. यावेळी मोठी गर्दी या ठिकाणी जमली होती.