खालुंब्रेमध्ये एचआर मॅनेजरची तरुणीवर जबरदस्ती; गुन्हा दाखल

1624

चाकण, दि. २८ (पीसीबी) – ट्रेनिंगच्या बहाण्याने ट्रेनिंगरुम मध्ये बोलवून एका एचआर मॅनेजरने २३ वर्षीय तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना १० एप्रिल २०१८ सकाळी साडेअकराच्या सुमारास चाकण येथील खालुंब्रे एमआयडीसीतील व्हीजन केबल कंपनीच्या ट्रेनिंग रुममध्ये घडली.

याप्रकरणी पिडीत २३ वर्षीय तरुणीने सोमवारी (दि.२७) चाकण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी त्यानुसार  खालुंब्रे एमआयडीसीतील व्हीजन केबल कंपनीचा एचआर मॅनेजर प्रविण कुमार (रा.खेड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत २३ वर्षीय तरुणी चाकण खालुंब्रे एमआयडीसीतील व्हीजन केबल कंपनीमध्ये काम करते. मंगळवारी (दि.१० एप्रिल २०१८) रोजी कंपनीचे एचआर मॅनेजर प्रविण कुमार याने तरुणीसह अण्य दोघांना कंपनीच्या ट्रेनिंगरुम मध्ये ट्रेनिंगच्या बहाण्याने बोलावून घेतले. त्यानंतर इतर दोघांना बाहेर जाण्यास सांगून आरोपी कुमार याने फिर्यादी २३ वर्षीय तरुणीवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तसेच घडलेला प्रकार कोणाला सांगितल्या कामावरुन काढून टाकण्याची धमकी दिली. यामुळे घाबरलेल्या पिडीत तरुणीने सोमवारी (दि.२७) चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. चाकण पोलिस तपास करत आहेत.