खातेदारांनी घाबरु नये पैसे सुरक्षित असल्याचा कॉसमॉस बँकेचा दावा

290

पुणे, दि. १४ (पीसीबी) – कॉसमॉस बँकेला ७८ कोटींहून अधिक रुपयांचा गंडा घातल्या गेल्यानंतर या प्रकरणावर कॉसमॉस बँकेने स्पष्टीकरण दिले आहे. बँकेच्या सीबीएस प्रणालीला काहीच धक्का पोहोचला नसून खातेदारांची सर्व माहिती आणि पैसे सुरक्षित असल्याचा दावा कॉसमॉस बँकेने केला आहे.

पैसे चोरीला गेल्यानंतर आज (मंगळवार) सकाळी बँकेने एक निवेदन प्रसिद्ध केले. या निवेदनात बँकेतील बचत ,मुदत ठेव आणि रिकरिंग खात्याला धक्का पोहोचला नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच नक्की किती रक्कम काढली गेली हे मात्र अजून स्पष्ट नाही तरी विदेशातून ७८ कोटींचा व्यवहार झाला असल्याच्या माहितीस बँकेने दुजोरा दिला आहे. शनिवारी जेव्हा बँकेतून पैसे काढले जात होते तेव्हाच बँकेला याची माहिती मिळाली होती आणि बँकेच्या डेटा सुरक्षिततेची सगळी काळजी घेण्यात आली होती हेही बँकेने स्पष्ट केले आहे. त्यामुळे खातेदारांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन कॉसमॉस बँकेने केले आहे.