खाजगी सावकाराच्या जाचाला कंटाळून विद्यमान उपसरपंचाची आत्महत्या

365

फलटण, दि. १८ (पीसीबी) – फलटण तालुक्यातील होळ गावाचे विद्यमान उपसरपंचांनी खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (दि. १७) रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आली आहे. आत्महत्येपुर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली असून त्यामध्ये खाजगी सावकाराचा फोन नंबर आणि रक्कमेचा उल्लेख केला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

विनोद बबन भोसले (वय ४०) असे आत्महत्य केलेल्या विद्यमान उपसरपंचाचे नाव आहे. मात्र, या प्रकरणी खाजगी सावकाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात नकार दिल्याने मृताच्या कुटूंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फलटन तालुक्यातील होळी येथील विद्यमान उपसरपंच विनोद भोसले यांनी काल (शुक्रवारी) रात्री आठच्या सुमारास जिंती खुंटे रस्त्यावर गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या  तपासात मृताच्या खिशात चिठ्ठी सापडली आहे. त्यामध्ये त्यांनी चार ते पाच सावकारांची नावे व रक्कम, त्यांचे मोबाईल नंबर लिहल्याचे आढळून आले, भोसले यांनी चिठ्ठीच्या चार झेरॉक्स काढून एक चिठ्ठी शर्ट मध्ये, एक पॅन्टमध्ये आणि मोटारसाकलच्या समोरील बाजूस व कव्हरमध्ये ठेवली होती.

दरम्यान, मी खाजगी सावकारकीला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी त्यात लिहीले आहे. पोलिस तपास करत आहेत.