खळबळजनक! पुण्यात भरदिवसा पोलिस चौकीपासून हकेच्या अंतरावर तरूणावर बेछुट गोळीबार

320

पुणे, दि. ६ (पीसीबी) – पुण्यात भरदिवसा गोळीबारची घटना घडली आहे. पोलिस चौकीपासून अगदी हकेच्या अंतरावर गोळीबार झाला आहे. त्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. चौकीच्या अगदी जवळच बेछुट गोळीबार झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी एका तरूणावर गोळीबार केला आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रोहित वडेवाले जवळील चंद्रभागा वाईन्सच्या समोर ही घटना घडली आहे.

सोमवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भारती विद्यापीठ पोलिस चौकीपासुन अगदी हकेच्या अंतरावर हा गोळीबार झाला आहे. भरदिवसा आणि पोलिस चौकीपासून हकेच्या अंतरावर गोळीबार झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. तरूणावर बेछुट गोळीबार झाल्याने तरूण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. गुन्हे शाखेतील पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, गोळीबार कशामुळं झाला हे अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान, ‘समीर मनूर शेख’ नाव असलेल्यावर बेछुट गोळीबार झाला आहे अशी माहिती समोर येत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे. दरम्यान, पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहचले असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही मिळतंय काय हे तपासण्याचे काम सुरू आहे.

पुण्यात भरदिवसा गोळीबार झाल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे. अति वरिष्ठ अधिकार्‍यांनी देखील घटनास्थळी धाव घेतली आहे अशी माहिती समोर आली आहे. नेमके किती राऊंड फायर झालेत हे सांगता येत नसलं तरी भारती विद्यापीठ पोलिस चौकीपासून हकेच्या अंतरावर बेछुट गोळीबार झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, याबाबत भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात दुपारी 12 वाजता या घटनेची खबर प्राप्त झाली आहे.

दरम्यान, गोळीबारामध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या समीर मनूर याचा जागीच मृत्यू झाला आहे अशी माहिती समोर येत आहे. समीर हा काँग्रेसचा पदाधिकारी होता.