खराळवाडीत आठ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन फरार झालेल्या आरोपीस अटक

0
888

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – खराळवाडीमधील एका मंदिरात आठ वर्षीय  मुलीवर लैंगिक अत्याचार करुन फरार झालेल्या १८ वर्षीय तरुणाला पिंपरी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने शनिवारी (दि. ९)  सकाळी अकराच्या सुमारास पिडीत मुलीवर लैंगित अत्याचार करुन फरार झाला होता.

याप्रकरणी आठ वर्षीय पीडित मुलीच्या आईने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार रोहन भांडेकर (वय १८, रा. पिंपरी) या तरुणाला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित आठ वर्षीय मुलगी शनिवारी सकाळी अकराच्या सुमारास खराळवाडी येथील एका मंदिरात खेळण्यासाठी गेली होती. मुलगी खेळत असताना आरोपी रोहन याने तिला मंदिरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलीने हा प्रकार घरी जाऊन आईला सांगितला. त्यावरून आईने पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. दरम्यान, आरोपी फरार झाला होता. पिंपरी पोलिसांनी त्याचा शोध घेऊन अटक केली. त्याला मोरवाडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला सोमवार (दि. १८) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.