‘खड्डे बुजविण्यासाठी याचिका दाखल करण्याची वेळच का येते’ – उच्च न्यायालय  

50

मुंबई, दि. ३१ (पीसीबी) – मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून मुंबई उच्च न्यायालयाने आज (मंगळवार) राज्य सरकारवर ताशेरे ओढले. ‘खड्डे बुजविण्यासाठी नागरिकांना न्यायालयात याचिका दाखल करण्याची वेळच का येते,’ असा संतप्त सवाल न्यायालयाने राज्य सरकारला केला. तसेच, या प्रश्नावर  सरकार काय उपाययोजना करणार याबाबतची सर्व माहिती प्रतिज्ञापत्रावर सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.