खडकीत लोखंडी पाईपने प्राणघातक वार करुन तरुणाचा खून

535

खडकी, दि. २७ (पीसीबी) – किरकोळ कारणावरुन झालेल्या भांडणातून एका तरुणावर लोखंडी पाईपने प्राणघातक वार करुन त्याचा खून करण्यात आला. ही धक्कादायक घटना शनिवारी (दि. २५) रात्री दहाच्याच्या सुमारास खडकी रेल्वे स्टेशन येथील ओव्हरब्रिजवर घडली.

रवी मारुती मोन (वय २८, रा. खडकी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी प्रशांत ऊर्फ परश्या गायकवाड (रा. खडकी)  याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत रवी आणि आरोपी प्रशांत हे एकमेकांच्या ओळखीचे होते. दोघेही खडकी येते राहतात. शनिवारी किरकोळ कारणावरुन त्या दोघांमध्ये वाद झाला होता. यादरम्यान आरोपी प्रशांतने लोखंडी पाईपने रवीवर प्राणघातक वार केले. यामुळे रवीचा जागीच मृत्यू झाला. प्रशांत विरोधात खडकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. खडकी पोलीस तपास करत आहेत.