खडकीत पीएमपी बसच्या धडकेत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू; पीएमपी बस चालकावर गुन्हा दाखल

103

पुणे, दि. १३ (पीसीबी) – मित्रासोबत दुचाकीवरुन जात असताना मागून आलेल्या एका भरधाव पीएमपी बस दिलेल्या जोरदार धडकेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सोमवार (दि.२५ जून) ला अपघात झाला होता. मंगळवारी (दि.२६) त्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.

पराग विनायक जोशी (वय ३०, रा. सिंहगड रोड) असे अपघातात जखमी होऊन मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पीएमपी बस चालक अर्जुन धोंडिराम डोंगरे (वय २८, रा. अप्पर डेपो) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (दि.२६ जून) पराग जोशी हा तरुण त्याचा मित्र जयेश तांबे  सोबत त्याच्या दुचाकीवरुन जात होता. यावेळी खडकी येथील अंडी उबवणी चौकात मागून आलेल्या एका भरधाव पीएमपी बसने त्यांना जोरदार धडक दिली. यात ते दोघेही गंभीर जखमी झाले होते. मात्र पराग याचा मंगळवारी (दि.२७ जून) सकाळी नऊच्या सुमारास उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.

दरम्यान जोशी कुटूंबीयांची मनस्थीती ठिक नसल्याने त्यांनी गुरुवारी (दि.१२) पीएमपी बस चालक अर्जुन डोंगरे विरोधात तक्रार दाखल केली आहे.