खडकीत किरकोळ वादातून तरुणाचा डोक्यात दगड घालून खून

167

खडकी, दि. १४ (पीसीबी) – दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून दोन महिलासह पाच जणांच्या टोळक्यांनी एकाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केल्याचा धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि.१३) रात्रीच्या सुमारास खडकी परिसरात घडली.

गोपाळ अर्जुन कांबळे (वय २९, रा. बंगला नंबर २३, खडकी बाजार) असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी राजेश राजू स्वामी, सागर अशोक उंबरकर, धीरज गवली, रेणूका परदेशी आणि राधा स्वामी असे संशयित आरोपीची नावे असून त्यापैकी रेणुका परदेशी आणि राधा स्वामी यांना खडकी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकीतील जुना बाजार परिसरात लष्करी अधिकाऱ्याचा जुना बंगला आहे. या बंगला परिसरात वरील सर्वजण बुधवारी रात्री दारू पित होते. त्यावेळी त्यांच्यात किरकोळ कारणावरुन भांडण झाले. त्यानंतर त्यांनी कांबळे याचा खुन केला. खडकी पोलीस तपास करत आहेत.