खडकवासला धरण परिसरातील चौपाटी दर रविवारी बंद!

168

पुणे, दि. २९ (पीसीबी) – खडकवासला धरण परिसरातील चौपाटीवरील खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी  होत आहे. त्यामुळे वाहनचालकांना वाहने हाकताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने दर रविवारी या चौपाट्या पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.  

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात काही ठिकाणी जलसमाधी आंदोलन करण्यात आली  आहेत. त्या पार्श्वभूमीवर तर हा निर्णय घेण्यात आला नाही ना, अशी शंका घेतली जात होती. मात्र,  वाहतुकीच्या कोंडीवर मार्ग काढण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान,  पुण्यातील ग्रीन थंब या संस्थेने  खडकवासला धरणामधून आतापर्यंत सुमारे १५ लाख ट्रक एवढा गाळ  काढला आहे. या गाळाचाच वापर करुन धरण परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे  या ठिकाणी पर्यटकांची  मोठी गर्दी होणार आहे.