क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती घेऊन महिलेची 80 हजारांची फसवणूक

20

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – अनोळखी व्यक्तीने फोन करून महिलेला क्रेडीट कार्डची गोपनीय माहिती विचारली. महिलेकडून गोपनीय माहिती घेऊन महिलेच्या क्रेडीट कार्डवरून 80 हजार 800 रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना 10 जून रोजी पहाटे लोकमान्य हॉस्पिटल चिंचवड येथे घडली. याबाबत 29 जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्वेता अशोक जामदार (वय 41, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी 9111855748 या मोबाईल फोन धारकावर गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्याकडे एक्सिस बँकेचे क्रेडीट कार्ड आहे. 10 जून रोजी पहाटे दीड वाजताच्या सुमारास फिर्यादी यांना 9111855748 या क्रमांकावरून फोन आला. फोनवरील व्यक्तीने फिर्यादी यांच्याकडून त्यांच्या क्रेडीटकार्डची गोपनीय माहिती विचारून घेतली. फिर्यादी यांनी सर्व माहिती फोनवरील व्यक्तीला सांगितली. त्याआधारे आरोपी व्यक्तीने फिर्यादी यांच्या क्रेडीट कार्डवरून 80 हजार 800 रुपये काढून घेत फिर्यादी यांची आर्थिक फसवणूक केली आहे.

पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 420, माहिती तंत्रज्ञान अधिनियमचे कलम 66 ड प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare