क्रूरतेचा कळस! कामाचे अमिश दाखवून मध्य प्रदेशातून भोसरीत आणून महिलेवर लैंगिक अत्याचार

178

भोसरी, दि. २७ (पीसीबी) – कामाचे आमिष दाखवून महिलेला मध्य प्रदेशातून भोसरी येथे आणले. त्यानंतर त्या महिलेवर भोसरी येथे वारंवार लैंगिक अत्याचार केले. ही घटना 9 मार्च 2021 ते 11 जून 2021 या कालावधीत भोसरी येथे घडली.

मुकेश रमेश पन्या (वय 27, रा. डिण्डोरी, मध्य प्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पिडित महिलेने मध्यप्रदेशातील डिण्डोरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा गुन्हा भोसरी परिसरात घडल्याने तो अधिक तपासाकरिता रविवारी (दि. 25) भोसरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुकेश याने पिडित महिलेला कामाचे आमिष दाखवून भोसरी येथे आणले. त्यानंतर तिला शस्त्राचा धाक दाखवून, मारून टाकण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. तिला घरात कोंडून ठेवले. तिचा मोबाइल फोडून टाकला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare