क्रुरतेचा कळस; निर्दयी बापाने तीन वर्षांच्या मुलाला रिक्षावर आपटले

54

हैदराबाद, दि. १० (पीसीबी) – तेलंगणाच्या हैदराबादमध्ये एका निर्दयी बापाने आपल्या तीन वर्षांच्या चिमुकल्याला अत्यंत क्रुरपने एका रिक्षावर आपटतले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. धक्कदायक म्हणजे पोलिसांच्या उपस्थितीत हा व्यक्ती आपल्या चिमुकल्याला रिक्षावर जोरात आपटताना दिसतोय.
मिळालेल्या माहितीनुसार, दारुच्या नशेतील या व्यक्तीचे पत्नीसोबत भांडण झाले होते. त्यानंतर त्याने सगळा राग आपल्याच चिमुकल्या मुलावर काढला. घटनेनंतर पोलिसांनी चिमुकल्याची सुटका केली आणि त्याला बाल कल्याण समितीकडे सोपावले, पण आरोपी बाप फरार झाला आहे. पोलिसांनी त्यांच्यावर आयपीसी कलम ३२४ आणि ज्यूवेनाइल जस्टिस अॅक्टच्या कलम ७५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.