क्रिकेटपटूकडून हुंड्यासाठी पत्नीचा छळ

365

ढाका, दि. २७ (पीसीबी) – बांगलादेशचा क्रिकेटपटू मोसादक हुसेनच्या पत्नीने हुंड्यासाठी आपला छळ होत असल्याचा आरोप केला आहे. हुंडा न दिल्यामुळे मोसादकने आपल्याला घरातून बाहेर काढल्याचेही पत्नी शर्मिन समायराने म्हटले आहे.

याप्रकरणी ढाका शहराच्या अतिरीक्त मुख्य न्यायालयीन दंडाधिकारी रोसिना खान यांनी मोसादकच्या पत्नीने केलेल्या आरोपांची दखल घेऊन, विशेष पोलिस अधिकाऱ्यांतर्फे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पत्नीने केलेल्या आरोपांवर मोसादकने आपली प्रतिक्रीया अद्याप दिलेली नाही. सहा वर्षांपूर्वी मोसादक आणि शर्मिन यांचा विवाह झाला होता. १३ सप्टेंबरपासून युएईमध्ये होणाऱ्या आशिया चषकासाठी बांगलादेशच्या संघात मोसादकचा समावेश करण्यात आला आहे.

दरम्यान, शर्मिनने दोघांमध्ये ठरलेल्या अधिकृत पोटगीपेक्षा जास्त रक्कम मागण्यास सुरुवात केली. हे पैसे न मिळाल्यामुळेच शर्मिन आपल्या भावावर आरोप करत असल्याचे, मोसादकचा भाऊ मोसाबर हुसेनने म्हटले आहे.