क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मारकाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

398

चिंचवड, दि. २३ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिका आणि क्रांतीवीर चापेकर स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवडगावात उभारण्यात येणाऱ्या क्रांतिवीर चापेकर बंधूंचे भव्य सहा मजली स्मारकाच्या दुस-या टप्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज (सोमवार) भूमिपूजन करण्यात आले.

हा कार्यक्रम चिंचवडगावातील, मोरया गोसावी क्रीडांगण येथे पार पडला. यावेळी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर नितीन काळजे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, क्रांतीवीर चापेकर स्मारक समितीचे अध्यक्ष गिरीश प्रभुणे, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार आदी उपस्थित होते.