कोल्हापूर, सांगली, सोलापूर आटोक्यात

34

पुणे विभागातील 3 लाख 35 हजार 93 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

पुणे, दि.28 (पीसीबी) : पुणे विभागातील 3 लाख 35 हजार 93 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 4 लाख 21 हजार 341 झाली आहे, तर ॲक्टीव रुग्ण संख्या 75 हजार 192 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 11 हजार 56 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यूचे प्रमाण 2.62 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 79.53 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. गेल्या आठवड्यातील कोरोना रुग्णांच्या वाढीचा वेग पाहता कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील रुग्ण संख्या आता आटोक्यात येत चालली आहे.

पुणे जिल्हा –
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 2 लाख 76 हजार 325 रुग्णांपैकी 2 लाख 28 हजार 476 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 41 हजार 660 आहेत. कोरोनाबाधित एकूण 6 हजार 189 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.24 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 82.68 टक्के आहे

सातारा जिल्हा –
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 35 हजार 401 रुग्णांपैकी 25 हजार 514 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 808 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 79 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा –
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 32 हजार 295 रुग्णांपैकी 24 हजार 12 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 157 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 126 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा –
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 33 हजार 877 रुग्णांपैकी 24 हजार 776 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 7 हजार 814 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 287 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा –
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 43 हजार 443 रुग्णांपैकी 32 हजार 315 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 9 हजार 753 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 375 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 5 हजार 427 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 313 , सातारा जिल्ह्यात 792 , सोलापूर जिल्ह्यात 483 , सांगली जिल्ह्यात 430 तर कोल्हापूर जिल्ह्यात 409 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये पुणे जिल्हयामध्ये 3 हजार 894 ,सातारा जिल्हयामध्ये 513, सोलापूर जिल्हयामध्ये 352 , सांगली जिल्हयामध्ये 855 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 427अशा रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 18 लाख 42 हजार 765 नमून्याचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 4 लाख 21 हजार 341 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

WhatsAppShare