कोल्हापूर व सांगलीतील पुरग्रस्तांना शिवतेज प्रतिष्ठानच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंची मदत  

170

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरा मुळे विस्थापित झालेल्या अनेक पुरग्रस्तांसाठी पिंपरी चिंचवड,  प्राधिकरणातील शिवतेज प्रतिष्ठान , कृष्णा डायग्नोसिस सेंटर , पिंपरी चिंचवड माऊंटेनरींग क्लब व एसीईएम शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने  मदतीचा हात दिला .

एकलिटर पाण्याचे १२५ बॉक्स , पारले बिस्कीटचे ५०बॉक्स , २०० ब्लँकेट्स व मेणबत्तीचे २१० बॉक्स विभागीय आयुक्त कार्यालयात देण्यात आले.  आज राज्यात  अनेक ठिकाणी पावसाने  थैमान घातले आहे . आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून प्रत्येकाने पुरग्रस्तांना  मदत करण्याचे आवाहन शिवतेज प्रतिष्ठान चे सुरेश वाडकर यांनी या प्रसंगी केले .