कोल्हापूरात मराठा आरक्षाच्या मागणीसाठी तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

133

कोल्हापूर, दि. ५ (पीसीबी) – राज्यभर मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन पेटले असताना आत्महत्येचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नाहीए. कोल्हापूरच्या जागृती नगर येथे राहणारे २६ वर्षीय विनायक परशुराम गुदगी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. गेल्या १० दिवसांपासून हा युवक आपल्या समाजाला आरक्षण मिळणार नाही या शंकेने अस्वस्थ होता. तसेच त्याचे वर्तन सुद्धा बदलले होते असे त्यांच्या बंधूंनी सांगितले आहे.

विनायक मूळचे बेळगाव येथील दड्डी गावातील रहिवासी होते. त्यांचे मूळ शिक्षण मराठीत झाले होते. गावातच नोकरी सुद्धा सुरू होती. परंतु, कन्नड भाषा येत नसल्याने कोल्हापूरला शिफ्ट झाले होते. या युवकाच्या आत्महत्येनंतर मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा कोल्हापूरात पहिला बळी पडला अशा सोशल मीडिया पोस्ट होत आहेत.