कोल्हापूरात नगराध्यक्षांनी दिलेल्या शिक्षेमुळे शिपायाला हृदयविकाराचा झटका

397

कोल्हापूर, दि. ३१ (पीसीबी) –  नाश्ता देण्यास उशीर झाला म्हणून नगराध्यक्षांनी हात जोडून उभे राहण्याची शिक्षा दिल्याने एका शिपायाला हृदयविकाराचा झटका आल्याचा प्रकार कोल्हापुरातील आजरा नगरपंचायतीमध्ये घडला आहे. ही घटना आजरा नगरपंचायतीत शुक्रवारी (दि.३०)  घडली.

सुरेश जाधव असे शिपायाचे नाव असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी भाजप पुरस्कृत नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी यांनी शिपायांना नाश्त्याची सोय करण्यास सांगितले होते. परंतु नाश्ता देण्यास उशीर झाल्याने शिक्षा म्हणून नगराध्यक्षांनी सुरेश जाधव यांच्यासह आणखी एका शिपायाला हात जोडून उभे राहण्याची शिक्षा दिली. मात्र शिक्षेमुळे अपमान झाल्याची भावना सुरेश जाधव यांच्या मनात आला. त्याचवेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली कोसळले. यानंतर नगरपंचायतीमधील इतर कर्मचाऱ्यांनी सुरेश जाधवांना तातडीने रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, असा कोणताही प्रकार झाला नसल्याचा दावा नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी यांनी केला आहे.