कोल्हापुरात महादेवराव महाडिक आणि सतेज पाटील यांचे कार्यकर्ते आमनेसामने

125

कोल्हापूर, दि. ११ (पीसीबी) – कोल्हापुरातील श्री राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत माजी आमदार महादेवराव महाडिक आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांचे कार्यकर्ते आज (बुधवार) आमनेसामने आले. यामुळे एकच गोंधळ उडाला. एका गटाकडून पत्रके भिरकावण्यात आली. तर दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

राजाराम कारखान्यांवर माजी आमदार महादेवराव महाडिक गटाची गेल्या अनेक वर्षापासून सत्ता आहे. आमदार सतेज पाटील यांच्या गटाकडून कारखान्याच्या कारभारावरून धुसफूस सुरू आहे. याचे पडसाद आजच्या सभेत उमटले.

आज कारखान्याची सर्वसाधारण सभा आयोजित केली होती. यावेळी पाटील गटाच्या समर्थकांनी कारखान्याच्या कारभारावरून सत्ताधाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. यावरून दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले . यामुळे काहीकाळ गोंधळ उडाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाजू सारत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला.