कोलकात्यात १४ मुला-मुलींचे मृतदेह सापडल्याने खळबळ

629

कोलकाता, दि. २ (पीसीबी) – पश्चिम बंगालच्या राजधानीत हरिदेवपूर परिसरात आज (रविवार) एका रिकाम्या प्लॉटवर तब्बल १४ नवजात मुला-मुलींचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे सगळेच देह प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये बांधून कचऱ्याप्रमाणे फेकण्यात आले होते. हरिदेवपूर परिसरातील राजा राम मोहन रॉय सारनी येथे मजुरांना प्लॉटची सफाई करताना हे मृतदेह सापडले. त्यांनीच पोलिसांना फोन करुन यासंदर्भातील माहिती दिली. पोलिसांनी प्रथमदृष्ट्या हे प्रकरण स्त्रीभ्रूण हत्या करणाऱ्या रॅकेटचे असल्याची शक्यता वर्तवली आहे.