“कोरोना हा हस्तांदोलन आणि डोळे, नाक व तोंडाला हात लावण्याने पसरू शकतो; त्यामुळे शेकहँड टाळा, नमस्कार करा”

87

महाराष्ट्र,दि.२१(पीसीबी) – कोरोना हा हस्तांदोलन आणि डोळे, नाक व तोंडाला हात लावण्याने पसरू शकतो; त्यामुळे शेकहँड टाळा, नमस्कार करा, असं आवाहन राष्ट्रवादी-काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागरिकांना केलं आहे. त्यांनी एका ट्विट द्वारे त्यांनी हे आवाहन केलं आहे.

कोरोना व्हायरसमुळे हस्तांदोलन टाळावे का? होय, श्वसनसंस्थेवर परिणाम करणारा हा व्हायरस हस्तांदोलन आणि डोळे, नाक व तोंडाला हात लावण्याने पसरू शकतो. शेकहँड टाळा, नमस्कार करा, असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

दरम्यान, राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. राज्याचे आरोगेयमंत्रीही जनतेला वारंवार दक्षता घेण्याच्या सूचना देत आहेत. आता शरद पवार यांनीही सोशल माध्यमाद्वारे जनजागृती केली आहे.