कोरोना व्हायरस निव्वळ बकवास; युरोपियन डॉक्टरांच्या गटाचा दावा

203

लंडन, दि. २६ (पीसीबी) कोरोनाव्हायरस ही निव्वळ एक कादंबरी आहे. कोरोना हा “सामान्य फ्लू विषाणू” आहे. कोव्हीड १९ साथीचा रोग सर्व देशभर होण्याची सुतराम शक्यता नाही, असा दावा वर्ल्ड डॉक्टर्स अलायन्स नावाच्या युरोपियन-आधारित गटाने पोस्ट केला आहे. त्या संदर्भातील एक व्हिडिओ त्यांनी पोस्ट केला आहे. कोरनाचा प्रसार एका व्यक्ती मधून दुसऱ्या व्यक्तीमध्ये होत नाही. कोरोना रुग्णाला आयसोलेशन अथवा क्वारंटाईनची गरज नाही तसेच सोशल डिस्ट्नसिंगचीही गरज नाही असेही त्यांनी व्हिडिओ मध्ये म्हटलेले आहे. कोरोनामुळे मृत झालेल्यांपेक्षा अधिक रुग्ण दरवर्षी निव्वळ कॅन्सर, ह्रदयरोग आणि अन्य आजाराने मरतात, असाही युक्तीवाद त्यांनी केला आहे. दरम्यान, एकिकडे जागतिक आरोग्य संघटना ((डब्लूएचओ) म्हणते की जानेवारी- फेब्रुवारी मध्ये पुन्हा कोरोनाचा प्रसार आणखी जोमात होईल तर दुसरीकडे युरोपियन डॉक्टर्स म्हणतात की कोरोना खोटा आहे. परस्पर विरोधी दाव्यामुळे जगभरातील नागरिकांमध्य संभ्रम निर्माण झाला आहे.

युरोपिय डॉक्टरांपैकी डच जनरल प्रॅक्टीशनर, एल्के डी क्लार्क, व्हिडिओवर म्हणतो की, “आपल्याकडे साथीचा रोग सर्वत्र नाही. कोव्हीड १९ एक हा एक सामान्य फ्लू विषाणू आहे. डी क्लार्क पुढे असा दावा करतात की, साथीचे रिपोर्ट निकृष्ट चाचणीवर आधारित होते. पॉलिमरेज चेन रिएक्शन किंवा पीसीआरसह, आण्विक चाचणी “89 ते 94%” प्रकरणात चुकीचे सकारात्मक परिणाम दर्शवते. ८६ टक्के पॉझिटिव्ह पेशंटमध्ये कुठलेही कोरोनाची लक्षणे नाहीत. ८७ हजारावर परिचारिकांना कोरोना बाबत संपर्क केला असता त्यांना कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. त्यामुळे कोरोना बाबत उगाचच भिती पसरवली जाते असे वाटते.

समान्यतः वर्षभरात ३०,००० मृत्यू होतात, त्यात १०,००० कॅन्सर, १०,००० ह्रदयरोग आणि अन्य आजारांतून १०,००० मृत्यू आहेत. त्या तुलनेत कोरोना मृत्यूंचे प्रमाण पाहता साथीचा युक्तीवादात तथ्य वाटत नाही, असे या डॉक्टरांनी म्हटले आहे.

पुढच्या काही महिन्यांत आणखी भयानक परिस्थिती –
गेल्या सात ते आठ महिन्यांपासून जगभरात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. मात्र, काही ठिकाणी अद्यापही परिस्थितीला गांभीर्याने घेतलं जाताना दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने मोठा इशारा दिला आहे. काही देशांमध्ये निष्काळजीपणामुळे कोरोनाची भयानक परिस्थितीत निर्माण झाली आहे. हीच परिस्थिती पुढच्या काही महिन्यांमध्ये आणखी भयानक होण्याची शक्यता आहे, असा दावा जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात आला आहे.

टेड्रोस एडहॉलम यांनी जगभरातील सर्व देशाच्या नेत्यांना कोरोना संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर कडक कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. कारण आता पुन्हा शाळा, महाविद्यालये, कंपन्या बंद होऊ नये आणि कोरोनामुळे आणखी जास्त लोकांचा बळी जाऊ नये, यासाठी टेड्रोस यांनी योग्य कारवाई करण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात जे सांगितलं होतं तेच पुन्हा सांगण्याची वेळ आली आहे, असं म्हणत टेड्रोस यांनी नाराजी व्यक्त केली.

“अनेक देशांमध्ये अद्यापही कोरोना संक्रमनाचे नवे रुग्ण आढळण्याचं प्रमाण हे मोठं आहे. काही देशांमध्ये ऑक्टोबर महिन्यात तर रुग्णालयांच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण आहेत. ही परिस्थिती आणखी बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे काही महिने जास्त चिंताजनक आहे”, असं जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.

“कोरोना संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर सर्व देशांनी टेस्टची क्षमता वाढवावी, जेणेकरुण बाधितांना तातडीने उपचार मिळेल. याशिवाय त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन करण्याची वेळ ओढावणार नाही”, असंदेखील जागतिक आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आलं आहे.

WhatsAppShare