कोरोना विषाणूमुळे मुंबईत आणखी एकाचा मृत्यू राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ७४ वरुन ८९ वर पोहोचला

83

 

मुंबई, दि.२३ (पीसीबी) – कोरोना विषाणूमुळे मुंबईत आणखी एकाचा मृत्यू झाल्याने आता देशातील मृतांचा आकडा आता ७ वर येऊन पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेली व्यक्ती ही ५९ वर्षीय फिलिपाईन्सची नागरिक असल्याची माहिती मिळत आहे.

ही व्यक्ती एका धार्मिक कार्यक्रमासाठी फिलिपाईन्सहून १० जणांच्या गटासह मुंबईत आली होती. ते सर्वात अगोदर मुंबईत आले. त्यानंतर ते नवी मुंबईत गेले आणि धार्मिक कार्यक्रमासाठी मुंबईतून दिल्लीला गेले. त्यानंतर ते दिल्लीतून पुन्हा मुंबईत आले आणि नवी मुंबईतील वाशी येथे गेल्याचे कळतंय.

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या व्यक्तीने मुंबई, नवी मुंबई आणि दिल्ली अशा तीन महत्त्वाच्या शहरात प्रवास आणि धार्मिक स्थळांवर वास्तव्यही केल्याचे समोर आले आहे. हा सर्व धक्कादायक प्रकार मुंबई महापालिकेच्या सतर्कतेमुळे समोर आला.

दरम्यान, राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा ७४ वरुन ८९ वर पोहोचला आहे.