नवी दिल्ली, दि. २२ (पीसीबी) – लवकरच कोरोनाची लस येणार असून लसीकरणाला सुरुवात होईल. मात्र भारतात कोरोनाची लस घेणाऱ्या व्यक्तींना लसीकरणानंतर काही दिवस मद्यपान करता येणार नाहीये.
इंडियन कॉऊंसिल फॉर मेडिकल रिसर्चचे आरोग्य अधिकारी डॉ. समीरन पांडे यांच्या सांगण्यानुसार, भारत बायोटेककडून तयार करण्यात आलेली कोवॅक्सीन ही लस घेतली तर 14 दिवसांपर्यंत मद्यसेवन करण्यास पूर्णपणे मनाई असणारे.
जगात कोरोनाचं लसीकरण प्रथम रशियामध्ये सुरु करण्यात आलं. दरम्यान रशियाममध्ये देखील कोरोनावरील स्पूतनिक व्ही ही लस घेतल्यावर 2 महिने मद्यसेवन न करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
तज्ज्ञांच्या सांगण्याप्रमाणे, कोरोनाची लस घेण्याअगोदर 7 दिवस आधीच नागरिकांनी मद्यपान बंद करावं. मद्यपान केल्यास शरीरामध्ये अँटीबॉडी तयार करण्यास अडथळा येऊ शकतो.