कोरोना बाधित १० लाख मृत्यू

19

नवी दिल्ली, दि. २९ (पीसीबी) – कोरोनाचा प्रादुर्भाव सगळीकडे झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्याही वाढत असून आतापर्यंत कोरोनामुळे जगभरातील 10 लाखांहून आधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची सर्वाधिक संख्या अमेरिकेत असून ती 2 लाखांहून अधिक आहे. त्यानंतर ब्राझिलमध्ये 1 लाख 41 हजार, भारतात 95 हजार 542, मॅक्सिकोत 76 हजार 430, ब्रिटनमध्ये 41 हजार 988 इतकी बळींची संख्या आहे.दरम्यान, कोरोनामुळे जागतिक अर्थव्यवस्थेचं नुकसान झालं असून काही देशांतील संबंधांमध्येही तणाव निर्माण झाला आहे.

देशातील करोनाबाधित रुग्णसंख्येने 61 लाखांचा टप्पा ओलांडला आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णसंख्या 61 लाख 45 हजार 576 वर पोहोचली आहे. देशात गेल्या 24 तासात 70 हजार 589 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 776 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य मंत्रालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे.देशात सध्या 9 लाख 47 हजार 576 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. आतापर्यंत 51 लाख 1 हजार 398 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.

WhatsAppShare