कोरोना बाधितांची संख्या २९०९

42

पिंपरी, दि. २९ (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहरातील कोरोनाचा प्रसार थांबायचे नाव घेत नाही, उलट रोज वेगाने वाढतोच आहे. आमदार महेश लांडगे आणि त्यांची पत्नी कोरोना बाधित असल्याचे कळाल्यावर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. त्यांच्या पाठोपाठ पोलिस आयुक्तालयाचील एक वरिष्ठ निरीक्षक बाधित झाल्याचे समोर आले. शहरात आज पर्यंत एकूण कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण २,९०९ आहेत. आज शहरातील १८७ आणि बाहेरिल १२ मिळून एकूण १९९ आहेत. एकूण मृतांची संख्या ७३ झाली आहे. त्यात शहरातील ४५ आणि शहराबाहेरील २८ जणांचा समावेश आहे. १७१७१ कोरोनामुक्त झाल्याचे समाधआन आहे.

आज दाखल संशयित रूग्णांची संख्या ३३० आहे. आज पासणीत निगेटिव्ह रूग्ण ६२ तर प्रतिक्षेतील अहवाल ८२५ आहेत. आज १८२ नागरिकांना होम क्वारंटाई केले. एकूण २७,०२७ होम क्वारंटाईन आहेत. दैनंदिन सर्व्हेक्षण ७४,१४० नागरिकांचे झाले आहे.

आज पॉझिटिव्ह आलेले रुग्ण आनंदभुवन सोसायटी थेरगाव, त्रिवेणीनगर तळवडे, पवारवस्ती दापोडी, दळवीनगर निगडी, गव्हाणेवस्ती भोसरी, विठ्ठलनगर नेहरुनगर, मोहननगर चिंचवड, संभाजीनगर, विवेकनगर आकुर्डी, काळभोरनगर चिंचवड, विठ्ठल मंदीर आकुर्डी, कलाटेनगर वाकड, शेंडगेवस्ती वाकड, गुलिस्तानगर कासारवाडी, गुरुदेवनगर आकुर्डी, दत्तवाडी आकुर्डी, गणेशनगर बोपखेल, घरकुल चिखली, तापकीरनगर काळेवाडी, गायकवाडवस्ती मोशी, चिंचवड स्टेशन, बापुकाटे चाळ दापोडी, वाकडकरवस्ती वाकड, केमसेवस्ती वाकड, बौध्दनगर पिंपरी, नवनाथ मंदीर बोपखेल, सदगुरुनगर भोसरी, भाटनगर पिंपरी, इंदिरानगर चिंचवड, भाऊ पाटील रोड दापोडी, अल्हाटवस्ती वाकड, साईप्रितमनगर रहाटणी, रिव्हररोड पिंपरी, मिलंदनगर पिंपरी, आदर्शनगर पिंपरी, रमाबाईनगर पिंपरी, सुभाषनगर पिंपरी, कोकणेनगर काळेवाडी, साईबाबानगर चिंचवड, राजेवाडेनगर काळेवाडी, कृष्णा ट्रेडर्स काळेवाडी, आळंदीरोड भोसरी, दळवीचाळ काळेवाडी, समृध्दी हॉटेल पिंपरी, तथागत हौसिंग सोसयटी पिंपरी, वाघेरे चाळ पिंपरी, पिंपरीगाव, शिवशक्ती हौसिंग सोसायटी निगडी, चिंचवडेनगर, गुरुदेवनगर आकुर्डी, फुलेचौक रहाटणी, दिघीरोड भोसरी, गणेशनगर थेरगाव, सुदर्शननगर चिखली, लक्ष्मीनगर रावेत, म्हातोबा मंदीर रोड वाकड, राजीव गांधी वसाहत नेहरुनगर, आळंदीरोड चिखली, केसर ट्री टाऊन मोशी, तानाजीनगर चिंचवड, सेक्टर २५ प्राधिकरण, नखातेनगर थेरगाव, लांडगेआळी भोसरी, खडकीरोड बोपोडी, अमरावती, सासवड, चाकण, देहुरोड, बीड, मुंबई, सुपे व खडकीबाजार येथील रहिवासी आहेत.

आज मृत झालेले रुग्ण खंडोबा माळ भोसरी, (पुरुष, वय-५१ वर्षें) व लातूर (पुरुष वय- ३६वर्षे) येथील रहिवासी आहे.
आज साईबाबानगर चिंचवड, पाटीलनगर चिखली, किनारा हॉटेल दापोडी, तापकीरनगर काळेवाडी, जयभिमनगर दापोडी, आर्दशनगर काळेवाडी, घरकुल चिखली, बौध्दनगर पिंपरी, खंडोबामाळ भोसरी, बिजलीनगर, आनंदनगर चिंचवड, आदर्शनगर दिघी, लांडेवाडी भोसरी, चऱ्होली, केशवनगर चिंचवड, घुले चाळ बोपखेल, वैदुवस्ती पिंपळेगुरव, सिध्दार्थनगर दापोडी, महात्मा फुलेनगर भोसरी, हनुमाननगर चिखली, पंतनगर चिखली, भाटनगर, रेल्वेगेट कासारवाडी, चिंतामणी चौक चिंचवड, खान्देशनगर मोशी, ऍटलास कॉलनी नेहरुनगर, काटेपिंपळे रोड पिंपळे गुरव, मोरवाडी कोर्ट, रिव्हररोड पिंपरी, प्राधिकरण, आंबेडकरनगर पिंपरी, देहु आळंदीरोड चिखली, भोईआळी चिंचवड, दत्तनगर वाकड, पुर्णानगर चिंचवड, मिलंदनगर पिंपरी, कुंजीरवस्ती पिंपळे सौदागर, संभाजीनगर चिंचवड, चंद्रलोक सोसायटी यमुनानगर, अशोक टॉकीज पिंपरी, भारतमाता नगर दिघी, चक्रपाणी वसाहत भोसरी, हारमोनी सोसायटी पिंपळे गुरव, मोहननगर चिंचवड, कोंढवा, कोथरुड, बावधान खुर्द, तळेगाव व बोपोडी येथील रहिवासी असलेले रूग्ण ‘कोरोनामुक्त’ झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पावसाळा सुरु झालेला असल्याने वैद्यकीय विभाग, पिं.चिं. मनपामार्फत सर्व नागरीकांना आवाहन करण्यात येत की अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडु नये. तसेच पावसाचे पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी घ्यावी व सोबत किमान १ तरी अतिरीक्त (Extra) मास्क ठेवावा, असे आवाहन केले आहे.

WhatsAppShare