कोरोना पॉझिटिव्ह माय-लेकीचा कुजलेला मृतदेह

66

वर्धा, दि.३ (पीसीबी) : समुद्रपूर तालुक्यातील सावंगी (झाडे) येथे रविवारी घरातच माय -लेकिचा (आई- मुलीचा) मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडली आहे. सुभद्रा डोमाजी मांडवकर (८०) व सुरेखा हरिश्चंद्र पाचखंडे (४५) अशी मृतांची नावे आहेत. मृत आई व मुलगी कुटुंबीयांपासून वेगळ्या राहत असत. शासकीय रुग्णालयात दोघांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर समुद्रपूर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. कोविड बाबतची दक्षता घेत पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. सुभद्रा आणि सुरेखा या मायलेकींचा मृत्यू कोरोनामुळेच झाला असावा, असा अंदाज वर्तविला जात आहे.

मुलगी अनेक दिवसांपासून आजारी
मुलगी सुरेखा पाचखंडे ही गेल्या काही दिवसांपासून आजारीच होती. काही दिवसांपूर्वी तिला हिंगणघाट येथील रुग्णालयातून आणण्यात आले होते. पण त्यानंतर दोघीही घराबाहेर पडल्याच नाहीत, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. रविवारी परिसरात दुर्गंधी पसरल्याचे लक्षात येताच घरात जाऊन पाहिले असता दोघांचंही मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळले. जिल्हयात सध्या कोरोनाबधितांचा आणि मृतकांचा आकडा वाढत आहे. अशातच अनेक रुग्ण तपासणी न करता घरीच राहत आहे. आरोग्य विभागाचे सध्या दुर्लक्ष असल्याने अनेकांचा घरीच मृत्यू होत आहे.

WhatsAppShare