कोरोना झालेले भाजप नेते लवकर बरे होतील – चंद्रकांत पाटील यांचे ट्र्विट

28

पुणे, दि. ८ (पीसीबी) – भाजपाचे अनेक नेते कसलीही पर्वा न करता कोरोना संकटात नागरिकांची सेवा करत आहेत, त्यातूनच त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ते सर्वजण लवकरच बरे होणार असल्याचा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून व्यक्त केला आहे.

दौंड विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे आमदार राहूल कुल यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी कळली. ते सुद्धा सतत जनसेवेसाठी कार्यरत असल्यामुळे त्यांना कोरोनाने ग्रासले.

मात्र, ते लवकरात लवकर बरे होऊन पुन्हा परततील, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे पाटील यांनी म्हटले आहे. कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि त्यांच्या मातोश्रींना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त कळले. पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असूनही मुक्ता टिळक सतत लोकांच्या मदतीसाठी कार्यरत होत्या. महापौरपदी असतानाही त्यांनी जनतेच्या मनात घर केले होते. त्यामुळे सर्व पुणेकरांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. तुम्ही लवकरच बऱ्या होऊन पुन्हा जनसेवेसाठी हजर रहाल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
महापौर मुरलीधर मोहोळ यांनीही कोरोनाचे संकट निवारण्यासाठी चांगले काम केले आहे. त्यांच्याही तब्बेतीची पाटील यांनी विचारपूस करून लवकर बरे होण्याचे आवाहन केले आहे.

WhatsAppShare