कोरोना काळात नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी मंडप उभारणा-या तिघांना अटक

27

भोसरी,दि.१८(पीसीबी) – कोरोनाच्या काळात कोणतेही सण-उत्सव साजरे करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. असे असतानाही भोसरी येथे सार्वजनिक रोडवर मंडप घालून रहदारीस अडथळा निर्माण करणा-या तिघांना भोसरी पोलिसांनी अटक केली आहे.

संतोष भानुदास गव्हाणे (वय 44), संजय शिवाजी नरवडे (वय 35), निलेश शिवाजी नरवडे (वय 30, तिघे रा. गव्हाणे वस्ती, भोसरी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई सुरेश नानासाहेब वाघमोडे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून कोरोना साथीच्या काळात नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी तसेच दुर्गा देवीची प्रतिष्ठापना करण्यासाठी रस्त्यावर संतोष अण्णा गव्हाणे सपोर्ट क्लब मार्फत मंडपाची उभारणी केली. यामुळे नागरिकांच्या रहदारीसाठी अडथळा निर्माण झाला. तसेच कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढविण्यासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाली. याबाबत तिघांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

WhatsAppShare