कोरोनामुळे निक्की तंबोली हिला बंधू शोक

24

मुंबई, दि. ४ (पीसीबी) : ‘बिग बॉस 14’ फेम अभिनेत्री निक्की तंबोली हिचा भाऊ जतीन तंबोली याचे कोरोनामुळे निधन झाले आहे. निक्कीचा भाऊ बराच काळ कोरोना आणि इतर आजारांविरुद्ध लढाई लढत होता. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन निक्कीने याबाबत माहिती दिली आहे. तिने भावाचा फोटो शेअर केला आहे आणि भावनिक पोस्टही शेअर केली आहे.

आपल्या भावाचा फोटो शेअर करताना निक्कीने लिहिले की, ‘आम्हाला माहित नव्हते की आज सकाळी देव तुमच्या नावाने आवाज देत होता. आमचे तुझ्यावर खूप प्रेम होते आणि तू गेल्यानंतरही आम्ही तुझ्यावर तेवढेच प्रेम करू. तुला गमावल्यानंतर आमचे हृदय तुटले आहे. तू एकटा गेला नाहीस, जाताना आमच्यातील एक महत्त्वाचा भाग घेऊन गेलास.’

निक्कीचा देखील कोरोनाशी संघर्ष
‘बिग बॉस 14’ची सेकंड रनरअप निकी तंबोली अलीकडेच कोरोनामधून सावरली आहे. काही दिवसांपूर्वी ती कोरोनाला बळी पडली होती, परंतु आता कोरोनावर मात केल्यानंतर अभिनेत्रीने इतरांना मदत करण्याची जबाबदारी स्वीकारण्याचे ठरवले आहे. निक्कीने आता गरजू लोकांना प्लाझ्मा दान करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर थेट लाईव्ह चॅट दरम्यान चाहत्यांना आपली मनीषा सांगितली. निक्कीने चाहत्यांना स्वतःची काळजी घेण्याचे आव्हान केले आहे.

निक्की म्हणाली, ‘कोरोना मुक्त झाल्यावर आता मी सरकारी रुग्णालयात प्लाझ्मा दान करणार आहे. ज्यांना याची गरज आहे आणि ज्यांना ते परवडत नाही, त्यांना हा प्लाझ्मा मिळू शकेल. मी सर्वांना सांगू इच्छिते की, आपण सर्वजण स्वत:ची काळजी घ्या, कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर माझा भाऊ देखील रुग्णालयात दाखल आहे. सध्या गोष्टी खूप वाईट आहेत. जेव्हा जेव्हा माझे पालक मला कॉल करतात, तेव्हा मला भीती वाटते की, आता काय होईल, हे मला माहित नाही. मला आशा आहे की, कोरोनाशी आपले युद्ध लवकरच संपेल आणि प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेतली पाहिजे.’

WhatsAppShare