कोरोनात भारत जगात सातवा

74

नवी दिल्ली, दि. १ (पीसीबी) – कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या पहिल्या १० देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारतामध्ये रविवारी रात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार कोरोनाचे १ लाख ९० हजार ६०९ रुग्ण आहेत. यासोबत भारताने फ्रान्सला मागे टाकलं आहे. फ्रान्समध्ये कोरोनाचे १ लाख ८८ हजार ८८२ रुग्ण असून भारताने फ्रान्सला मागे टाकलं असून नवव्या क्रमांकावरुन सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या क्रमांकावर अमेरिका अद्याप कायम असून अमेरिकेत कोरोनाचे १८ लाख रुग्ण आहेत. यानंर ब्राझील आणि रशियाचा क्रमांक आहे.

ब्राझीलमध्ये कोरोनाचे पाच लाख तर रशियात कोरोनाचे चार लाख रुग्ण आहेत. पहिल्या क्रमांकावर अमेरिकेत असून त्यानंतर अनुक्रमे ब्राझिल, रशिया, स्पेन, इंग्लंड, इटली आणि त्यानंतर भारताचा क्रमांक आहे.
गेल्या चोवीस तासांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची पुन्हा सर्वाधिक वाढ झाली. शनिवारी दिवसभरात ८,३८० नवे रुग्ण आढळले असून देशभरात कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या १ लाख ८२ हजार १४३ इतकी झालेली आहे. एका दिवसात पहिल्यांदाच ८ हजारचा आकडा पार झाला आहे. कोरोनाच्या रुग्णांच्या मृत्यूंची संख्यादेखील पाच हजारहून जास्त झाली असून गेल्या चोवीस तासांमध्ये १९३ रुग्णांचा मृत्यू झाला. एकूण ५,१६४ रुग्णांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासांमध्ये ४,१६४ रुग्ण बरे झाले असून हे प्रमाण ४७.७६ टक्के आहे. देशभरात ८९,९९५ रुग्णांवर उपचार केले जात आहेत.

देशात गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचं दिसत आहे. एकीकडे भारत गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेला लॉकडाउन शिथील करत असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने चिंता वाढली आहे.

WhatsAppShare